चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या

पती अटकेत, मुठवली आदिवासीवाडीतील घटना
माणगाव | प्रतिनिधी |
पतीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला लाथाबुक्याने,कोयत्याने व कुर्‍हाडीने मारहाण करून तिची हत्या केली.सदरील घटना माणगाव तालुक्यातील मुठवली आदिवासीवाडी येथे बुधवारी 22 डिसेंबरला दुपारी 3:30 वाजण्याच्या पूर्वी फिर्यादी यांच्या राहते घरात घडली. घटनेची फिर्याद गोविंद महादेव धाडवे रा.मुठवली तर्फे तळे ता.माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.या घटनेतील आरोपी पतीला माणगाव पोलिसांनी अटक केली आहे.
पांडुरंग संत्या हिलम(वय-45) आणि त्याची पत्नी लीला पांडुरंग हिलम (वय-33) रा.मुठवली आदिवासीवाडी ता.माणगाव हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला लाथाबुक्याने कोयत्याने व कुर्‍हाडीने मारहाण करून लहानमोठ्या गंभीर स्वरूपाच्या दुखापती करून तिची हत्या केली.
या घटनेची माहिती समजताच महाड तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अतिरिक्त कार्यभार माणगाव श्री.तांबे यांनी घटनास्थळी भेट दिली.या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात भादवि 302 प्रमाणे करण्यात आली आहे.

Exit mobile version