। खोपोली । वार्ताहर ।
खोपोली शहाराजवळून जाणार्या मुंबई-पुणे महामार्गावर रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत निर्जन ठिकाणी गाई, बैल, म्हशी अश्या जनावरांची कत्तल केली जात आहे. खोपोली परिसरातील काटरंग भागात एका गाभण गायीची निर्घृण हत्या करुन तिचे मांस पळवून नेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी रात्री ही अशीच घटना काटरंग धनगरवाडा डोंगरात घडली आहे, गायीच्या कत्तलीचे रक्त सर्वत्र पसरले असून जनावरांचे काही अवयव झुडपात टाकण्यात आले आहेत तर एक गायीचे मृ अर्भक तेथे आढळले आहे. त्यामुळे गाभण असणार्या गाईलाही या तस्करांनी सोडली नाही हे दिसून आले आहे.