। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
सध्या गणेशोत्सव सण अगदी तोंडावर आल्याने गणेशाच्या मुर्ती बनवणार्या कारखान्यांमध्ये मुर्तीवर रंगाचा शेवटचा हात फिरवण्यासाठी काररगिरांची लगबग सुरू आहे. वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या रंगांनी रंगवलेल्या गणेशमूर्ती सध्या कारखान्यांमध्ये तयार होताना पहावयास मिळत आहेत. तयार झालेल्या गणेशमूर्ती विक्रीसाठी इतरत्र पाठवण्याची कामही वेगाने सुरू आहे. येत्या 10 सप्टेंबर ला गणेशोत्सवाला सुरूवात होत आहे. सध्या गणेशमूर्ती तयार झाल्या असुन मुर्तीवर रंगकाम करण्याचे काम वेगात सुरू आहे. गणेशोत्सवात आकर्षक गणेश मूर्तीला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. त्यामुळे अनेक कारागिरांचा आकर्षक मूर्ती बनवण्याचे कल असतो. सध्या वेगवेगळ्या आकाराच्या मूर्ती तयार असून रंगकामही अंतिम टप्प्यात आल्याचे पहावयास मिळत आहे.
मुरुड तालुक्यात सुमारे 150 गणपती कारखानदार असून सर्वच कारखानदार गणपतीचे काम अंतिम टप्याकडे नेण्याचे काम सुरु आहे. पाऊस थांबल्यामुळे वीज जाण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे यंदा सर्वांचे गणपती वेळेत मिळणार आहेत. मुरुड तालुक्यात सार्वजनिक गणपतीची प्रथा नसून इथे प्रत्येक घरात स्वतंत्र गणपती आण्याची परंपरा आहे. रेवदंडा व मुरुड पोलीस ठाणे हद्दीत सुमारे दहा हजाराच्यावर गणपती प्रत्येकाच्या घरात आणले जातात. मुरुड तालुक्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्ती बनवल्या जात नाही. त्यामुळे येथे पर्यावरणाचे संवर्धन केले जाते. यंदा गणेश मूर्तीच्या किमतीती पाच टक्के वाढ झाली आहे. तरी सुद्धा दरवर्षी प्रमाणे उत्साह तोच दिसून येत आहे. गणपती मूर्ती बनवण्याचे काम पूर्ण झाले असून आता कारखानदार कलारकामात गुंग झाल्याचे दिसून येत आहे.