रेल्वे कर्मचाऱ्याची हत्या करणारा गजाआड

| अलिबाग | प्रतिनिधी |

रेल्वेमध्ये कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर गोळीबार करून हत्या करण्यात आली. रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने हत्या करणाऱ्याला गजाआड केले. त्याच्याकडून दोन बंदुका, गोळ्या आदी ऐवज जप्त केला असून ही हत्या चंद्रकांत कांबळे यांच्या बहिणीला पोटगी देण्याच्या वादावरून करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली.

पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नागेश कदम, पोलिस उपनिरीक्षक धनाजी साठे, पोलिस उपनिरीक्षक विकास चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक विशाल शिर्के व 24 पोलीस अंमलदार यांची चार पथके तयार करून तपासासंदर्भात वेगवेगळी जबाबदारी सोपविली. गुन्हा घडल्याच्या परिसरातील वेगवेगळे मोबाईल लोकेशन आदी विविध माहिती सायबर गुन्हे शाखेचे पोलीस नाईक तुषार घरत, पोलीस नाईक अक्षय पाटील यांच्या मार्फत घेण्यात आली.

मयत चंद्रकांत कांबळे यांची बहीण विमल हिचा विवाह विजय रमेश शेट्टी यांचेसोबत झाला होता. 2016 मध्ये विजय शेट्टी व विमल या दोघांचे नावाने रोहा तालुक्यातील धाटाव या ठिकाणी घर खरेदी केले होते. विजय व त्याची पत्नी या दोघांमध्ये पटत नव्हते. त्यामुळे विमल तिच्या माहेरी चंद्रकांत यांच्याकडे राहत होती. विजय शेट्टी याचेकडे तिने घटस्फोट मागितला होता. पोटगी म्हणून 10 लाख रुपये मागितले होते. त्यामुळे विजय शेट्टी याने चंद्रकांत कांबळे यांना ठार मारण्याची धमकी विमल यांच्यासमोर दिली होती. या मुद्द्यावरून पोलीसांचा संशय बळावला.

द्रकांत कांबळे यांच्या हत्येच्यावेळी विजय शेट्टी परिसरात असल्याची माहिती समोर आली. पोलीसांनी वेगवेगळ्या पध्दतीने शोध घेतल्यावर हा खून विजय शेट्टी यानेच केल्याचे सिध्द झाले. त्यानंतर विजय याला पकडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे, पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण, पोलीस हवालदार जितेंद्र चव्हाण, पोलीस हवालदार अमोल हंबीर, पोलीस हवालदार प्रतिक सावंत, पोलीस शिपाई अक्षय सावंत असे एक पथक तयार पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची परवानगी घेवून अक्कलकोट येथे रवाना झाले. स्वामी समर्थ मंदिराच्या परिसरात शोध मोहीम राबिवली. मोठ्या शिताफीने त्याला तेथून ताब्यात घेऊन कोलाड येथे आणण्यात आले.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नागेश कदम, पोलिस उपनिरीक्षक धनाजी साठे, विकास चव्हाण, विशाल शिर्के , पोलीस कर्मचारी प्रसाद पाटील, दीपक मोरे, संदीप पाटील, सुधीर मोरे, प्रसन्न जोशी, यशवंत झेमसे, अमोल हंबीर, प्रतीक सावंत, श्यामराव कराडे, जितेंद्र चव्हाण, सुदीप पहेलकर, राकेश म्हात्रे, विकास खैरणार, रुपेश निगडे, विशाल आवळे, सचिन वावेकर, ईश्वर लांबोटे, भरत तांदळे, बाबासो पिंगळे, अक्षय सावंत, अक्षय जगताप, ओंकार सोंडकर, मोरेश्वर ओंबळे, लालासो वाघमोडे, स्वामी गावंड, रुपेश पाटील सायबर पोलिस ठाणेचे तुषार घरत, अक्षय पाटील. यांनी गुन्हयाच्या तपासात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

यापुर्वीदेखील त्याने केली होती दुहेरीहत्या
विजय शेट्टी याचे मुळ नाव लक्ष्मीकांत कलशेट्टी असून तो मुळचा कर्नाटक राज्यातील असून त्याच्या भावासोबत वयाच्या 15 व्या वर्षी रेतीबंदरमध्ये कामानिमित्त आला होता. विजय शेट्टी या नावाने तो बेलापूर येथे राहत होता. त्याने यापुर्वी त्याची बहिण शांताबाई हिचा पती व दीर सिध्दप्पा या दोघांची चाकूने हत्या केली होती. त्यानंतर 1999 मध्ये उरण येथील ओबीजे कंपनीतील व्यवस्थापक व चालक यांची गोळी घालून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात दुहेरीहत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पत्नीच्या भावाची हत्या करण्यासाठी त्याने दोन महिन्यापुर्वी उत्तरप्रदेश राज्यातील बनारस येथून दीड लाख रुपये किंमतीची बंदूक आणल्याची माहिती पोलीसांनी दिली. चंद्रकांत कांबळे यांची हत्या त्यांच्या बहीणीच्या पतीनेच केल्याचे सिध्द झाले आहे. त्यांना अटक करण्यास पोलीसांना यश आले आहे. ही हत्या कौटूंबिक वादावरून करण्यात आली असून मारेकऱ्याविरोधात यापुर्वीदेखील दुहेरी हत्याकांड केल्याचे उघड झाले आहे.विजय शेट्टी असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून 23 सप्टेंबरपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून जिवंत काडतूस व दोन बंदुक्या जप्त करण्यात आल्या आहेत. मोठ्या शिताफीने पकडण्यास स्थानिक गुुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे.

सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, रायगड
Exit mobile version