मुरुडचा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी होतोय सज्ज

सुशोभिकरणचं काम प्रगतीपथावर

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड जंजिरा या ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक देश-विदेशातून येत असतात. याठिकाणी पर्यटकांची संख्या वाढावी, यासाठी मुरुड परेश हॉटेल समुद्रकिनारा ते गोल्डन स्वॉन ब्रिच हॉटेल समुद्रकिनारा सुशोभिकरणासाठी नगरपरिषदेकडून कोट्यवधी रुपयांची निधी मंजूर करण्यात आला असून, ते काम प्रगतीपथावर आहे. या कामाचा ठेका व्ही.डी.के. फॅसिलिटी सर्व्हिसेसला मिळाला आहे.

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी नगर परिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मुरुड समुद्रकिनारी सुरुचे उद्यान विकसित करण्याकरिता 3 कोटी 94 लाख 85 हजार 435 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीतून पर्यटनस्थळांवर पर्यटकांसाठी सागरी धूपप्रतिबंधक बंधारा, लॉन, फ्लॉवर बेड, वाहनतळनिर्मिती, स्वच्छतागृह, पाथवे आदी सुविधांचा समावेश असणार आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओघ वाढून यामधून स्थानिकांना रोजगार उपलब्ध सुविधा उभारण्यात येणार आहेत.

Exit mobile version