| आगरदांडा | वार्ताहर |
मुरुडमधील कोळीवाडा येथील समुद्रलगत बांधण्यात आलेल्या पिंडदान शेड उभारण्यात आले आहे.या कामाची मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी पाहणी केली. यावेळी मनोज पुलेकर, तुषार कदम, अजय पाटील व कोळीबांधव उपस्थित होते. नगरपरिषद वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधी मंजूर करुन व्हि.डी.के.कन्ट्रकशन यांना मंजूर करण्यात आले होते. हे काम प्रगतीपथावर असून लवकरच या कामाचे लवकरच लोकापर्ण होणार आहे.याशिवाय सार्वजनिक शौचालयांचे कामही प्रगतीपथावर असल्याचे मुख्याधिकार्यांनी सांगितले.