मुरूड भरणार आनंदमेळा; व्हेज, नॉनव्हेज मेजवानी; समुद्रकिनारी धमाल

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
यंदाचा डिसेंबर महिना पर्यटनाने बहरणार असून, ख्रिसमसदेखील कोरोनामुक्त वातावरणात असल्याने पर्यटकांची उपस्थिती लक्षणीय राहील असे संकेत मिळत आहेत. त्या दृष्टीने येत्या 24 आणि 25 डिसेंबर रोजी समुद्रकिनार्‍यानजीक हिंदू बोर्डिंग ओंकार बालवाडी प्रांगणात मुरूड महिला मंचच्या वतीने आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी यामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात व्हेज/ नॉनव्हेजचे लज्जतदार पदार्थ उपलब्ध होणार आहेत. कपडे, ज्वेलरी, कपडे, खेळणी, सौंदर्य प्रसाधने, लोणची, पापड आणि निवडक आवश्यक गोष्टी प्रामुख्याने मेळाव्यात खरेदी करायला मिळतील. 24 आणि 25 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत मेळावा आणि फूड फेस्टिव्हल सुरू राहील. यासाठी स्टॉल्स लावण्यार्‍या स्थानिक आणि परगावच्या महिलांनी नाव नोंदणीसाठी करिष्मा प्रतीक आंबूर्ले 8698970349 आणि निलांबरी गौरव हणमंते 8805989998 किंवा आंबूर्ले मेडिकल स्टोअर्स बाजारपेठ मुरूड येथे अधिक माहितीसाठी संपर्क करावा. स्टॉलचे एक दिवसीय भाडे 600/- इतके आहे. स्टॉल दोन दिवस लावला जाणार आहे. दोन दिवसाचे भाडे 1200/- रुपये इतके असेल.

Exit mobile version