म्हावर्याअभावि पर्यटक नाराज
| मुरुड जंजिरा | सुधीर नाझरे |
मुरुड परिसरातील पर्यटन पुन्हा बहरु लागले आहे.सध्या सकाळी थंडी तर दुपारी गरम असे वातावरण असल्याने विकेन्डला मुरुडच्या किनार्यावर येणे पसंत करत आहेत. परंतु मासळी बाजारातून मासळी गायब झाल्याने पर्यटक नाराज असल्याचे दिसत आहे. समुद्रकिनारी असलेली हॉटेल उन्हाळी सुटीसाठी सज्ज झालीत.सर्व हॉटेल रंगरंगोटी,,विविध रंगाची रोषणाई,नवनवीन चविष्ट पदार्थांचे स्टॉल्स,समुद्रावर घोडेसवारी, मोटारबाईक ,पाणीपुरी ,भेळ पुरी अशा विविध स्टॉल्सनी किनारा बहरला आहे
नगरपालिकेने समुद्रकिनारी असलेली विश्रामधाम बागेचे नूतनीकरण केल्याने त्याचा लाभ पर्यटकांना होते. पालिकेचे कर्मचारी समुद्रकिनारी दिवसातून 3 वेळा स्वच्छता करताना दिसत आहेत. गारंबी धरण, कुडे मांदाड लेणी, खोकरी दत्तमंदिर या पर्यटन स्थळावर स्वछता करून खाण्यापिण्याचे स्टॉल करण्यात आलेत. सलग सुट्टी असल्याने पर्यटकांसाठी मुरुड तालुका सज्ज आहे
गेली 2 वर्ष कोरोनामुळे हॉटेल व्यवसाय डबघाईला आला होता.या वर्षी उन्हाळी सुट्टीचे बुकिंग चांगली झाली आहे. पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात मुरुडला यावे आम्ही त्यांना उत्तम सेवा देऊ व हॉटेल भाडे योग्य दरात घेऊ. – किशोर धमसकर (हॉटेल व्यावसायिक )
उन्हाळी पर्यटनासाठी मुरुड सज्ज झाले आहे. पिण्याचे पाणी,शहरातील रस्ते व समुद्रकिनार्याच्या स्वच्छतेकडे लक्ष दिल्याने पर्यटकांना त्रास होणार नाही पर्यटकांनी समुद्रात जाताना भरती ओहोटी याचे भान ठेऊन सुरक्षित आनंद लुटावा. – पंकज भुसे, मुख्याधिकारी