| आगरदांडा | प्रतिनिधी |
जी.एम. वेदक विज्ञान महाविद्यालय, तळा आणि भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा (इनकॉईस), भू-विज्ञान मंत्रालय भारत सरकार, हैदराबाद तसेच जयभवानी मच्छिमार सहकारी संस्था मुरुड याच्या संयुक्त विद्यमाने मुरुड समुद्र किनारी दि. 20 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
भारतातील सर्व ठिकाणी स्वच्छ सागर सुरक्षित सागर या संकल्पनेद्वारे स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली. सर एस.ए. ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तसेच मच्छिमार संघाचे पदाधिकारी व कोळी बांधवांनी विशेष सहभाग नोंदवला.
या स्वच्छता अभियानात प्रमुख पाहुणे म्हणून तटरक्षक दलाचे कमांडंट निशांत भरतद्वाज, बंदर निरीक्षक प्रमोद राऊळ, मुरुड नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी नंदकुमार आंबेतकर, सर एस.ए. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. बी.एस. मोरे, प्रा. आनंद तोंडले पाटील, दिघी अदानी पोर्टचे अधिकारी सत्यंद्रनाथ, मत्स्यव्यवाय विकास अधिकारी, वन विभागाचे अधिकारी, राज्य मच्छिमार संघाचे सदस्य मनोहर बैले, एकदरा संस्थेचे जगन वाघरे, जयभवानी मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष प्रकाश सरपाटील, ललित मढवी, मनोहर गार्डी, ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील नागरिक आणि मच्छिमार बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होऊन राष्ट्रनिर्मितीसाठी सर्वांनी सहकार्य केले आहे. लोकांमध्ये सागर स्वच्छता विषयी जनजागृती निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी इनकॉईसचे प्रशासकीय अधिकारी संतोष कुमार, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्या डॉ. एस.एस. मिर्झा, प्रकाश सरपाटील, महेंद्र गार्डी, नरसिंह मानाजी, डॉ. बी.जी. भवरे आणि जी.एम. वेदक महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.







