ओहोटीला बोटी किनारी आणणे कठीण
| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
मुरुड समुद्रकिनारी 2016 साली एकदरा खाडीतील गाळ काढण्याचे काम मच्छिमार विभागाने केले, त्यावेळी सात कोटी खर्च करून खाडीतील गाळ काढण्याचे काम तीन महिने सुरु होते. तो गाळ कडून विश्रामधाम किनारी टाकण्यात आला. परंतु, समुद्रातील मुरुडला येण्याचे पात्र मोठे करण्यासाठी एकदरा येथील खडक कापून न काढण्याने केल्याने आज मुरुडच्या मासेमारांना ओहोटीला किनारी येणे कठीण झाले आहे. किनारा वाळूनी भरला आहे. पाच तास समुद्रात भरतीचे पाणी भरेपर्यंत ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे मासेमारांची मागणी आहे कि खडक कापून वाळू गाळ साफ करून मुरुडकडे येण्याचा मार्ग मोठा करावा व समुद्रातील वाळू पुन्हा येऊ नये म्हणून ग्रॉइन बंधारा बांधावा अशी मच्छिमारांची मागणी आहे.
मुरुडच्या कोळी बांधवाना खोल समुद्रात जाताना येताना येण्याचा मार्ग अतिशय अरुंद असल्याने अनेक अडचणीला सामोरे जावे लागते, पूर्वी मासे चांगले मिळत असत परंतु कारोंना काळात व हवामान बदलामुळे मासेमारीचा दुष्काळ आहे. त्यात वाळू गाळामुळे बोटी अडकतात आणि कोळी बांधवाचे मोठे नुकसान होते , सर्वप्रथम ग्रॉइन बंधारा बंधने गरजेचे आहे. शासन मासेमारीच्या सम्स्त्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. आदीच कर्जात अडकलेला कोळी बांधव उध्वस्त होणयापासून वाचला पाहिजे.
मनोहर बैले, मच्छिमार







