| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूडमधील परेश नाका ते एकदरा पुलापर्यंतची रस्ताची दयनिय अवस्था झाली आहे. तसेच, मच्छीमार्केट जवळील रस्त्याला तलावचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे वाहन चालकांना व स्थानिक नागरिकांना या रस्तातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागत आहे.
अनेक वर्षांपासून परेश नाका ते एकदरा पुलापर्यंतचा रस्ता नव्याने बनला गेला नाही. हा रस्ता बनविण्याकरिता अनेक निवेदन देण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वी शासनातर्फे लाखो रुपयांची निधी देण्यात आला होता. मात्र, अद्यापही या रस्त्यावर डांबर पडलेच नाही. याचा नाहक त्रास प्रवाशांसह स्थानिकांना करावा लागत आहे. यासंदर्भात अरविंद गायकर यांनी आमारण उपोषणचा इशारा देऊन ते तहसीलदार कार्यालयासमोरील प्रांगणात आमरण उपोषणाला बसले होते. दोन दिवसांनी रस्त्याच्या कामाला सुरुवात करु, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा दोन महिन्यांनी आमरण उपोषणाचा दिल्यावर या रस्त्यावरचे खड्डे बुजाविण्यात आले होते. परंतु, सुरूवातीच्या पावसातच बुंजवलेले खड्डे पुन्हा खुले झाले आहेत. त्यामुळे या रस्त्याची अवस्था आणखीनच बिकट झाली आहे. त्यामुळे याला जबाबदार कोण, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.