मुरूड गारठले; जनजीवनावर परिणाम

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
गेल्या 15 दिवसांत मुरूड तालुक्यातील वातावरणात सातत्याने चढ-उतार होत आहे. रविवारी थंडीचा गारठा वाढला असून, तापमानचा पारा 15 अंश सेल्सियस इतका खाली आल्याने हुडहुडी भरली आहे. मानवा बरोबरच समुद्रातील माशांना देखील याची मोठी झळ बसली असल्याचे जाणवले आहे.

थंडीचा मोठा परिणाम जनजीवनावर झाला असून, अनेक जण उबदारपणा मिळविण्यासाठी उपाययोजना करताना दिसत आहेत. या बोचर्‍या थंडीचा मोठा त्रास रुग्णांना होत असून हृदयरोग, ताप,थंडी, खोकल्याचे रुग्ण दिसत आहेत. समुद्रात पाण्यावरदेखील परिणाम होऊन पाणी अधिक थंड झाले असून, मासळी खोल समुद्रात गेल्याची माहिती मच्छिमारांनी दिली.

Exit mobile version