मुरुड नगरपरिषदः १० पैकी १० जागी महिलांना संधी

| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड जंजिरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीकरिता सायंकाळी चार वाजता नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. भूसंपादन उपजिल्हाधिकारी काळ प्रकल्प माणगाव नितीन राऊत व नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण प्रक्रिया पार पडली. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, जाहीर झालेल्या आरक्षणानुसार, वॉर्ड क्र. 1 खुला नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व खुला सर्वसाधारण, वॉर्ड क्र. 2 नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व खुला सर्वसाधारण, वॉर्ड क्र. 3 खुला महिला व सर्वसाधारण, वॉर्ड क्र. 4 महिला खुला महिला व खुला सर्वसाधारण, वॉर्ड क्र. 5 नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व खुला सर्वसाधारण, वॉर्ड क्र. 6 खुला नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग सर्वसाधारण व खुला महिला, वॉर्ड क्र. 7 नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग सर्वसाधारण व खुला महिला, वॉर्ड क्र. 8अनु. जमाती सर्वसाधारण व खुला महिला, वॉर्ड क्र. 9 अनु. जमाती महिला व खुला सर्वसाधारण, वॉर्ड क्र. 10 अनु. जमाती महिला व खुला सर्वसाधारण आरक्षण पाडण्यात आले.

यावेळी प्रशासकीय अधिकारी परेश कुंभार, नरेंद्र नांदगावकर, संजय वेटकोळी, सुदेश माळी, गोपाळ चव्हाण, सतेज निमकर, नंदकुमार अंबेतकर, जयेश चोडणेकर, ललीत जैन, मनोज भगत, माजी उपनगराध्यक्षा नौसिन दरोगे, गिरीश साळी, विजय पैर, माजी नगरसेवक आशिष दिवेकर, प्रमोद भायदे, शिवसेना शहरप्रमुख आदेश दांडेकर, सुपारी संघ चेअरमन महेश भगत, विजय भोय, माजी नगरसेवक पाडुरंग आरेकर, सुधीर पाटील, मनोहर बैले आदींसह मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version