पोलिस अधीक्षकांच्या हस्ते प्रमाणपत्र; आंचल दलाल यांच्याकडून कौतुक
| आगरदांडा | प्रतिनिधी |
अंमली पदार्थ विक्री व वाहतूक प्रकरणी मुरुड पोलिसांनी 13 आरोपीना अटक करून त्यांच्याकडून 13, 80, 000 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल रायगड अलिबाग पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडून मुरुड पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांसह 8 पोलिसांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
मुरुड ठाण्याच्या हद्दीत 29 जून रोजी मुरुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख व त्यांचे सहकारी रात्रीच्या वेळी शीघ्रे चेक पोस्ट येथे नाका बंदी करीत होते. याचवेळी नाका बंदी दरम्यान शिघ्रे पोलीस चेक पोस्टजवळ रात्रीच्या वेळी रस्त्यावरुन सुझुकी ग्रे रंगाच्या मोटार सायकलवरुन तरुण मुरुडच्या दिशेने जात होता. ट्राफीक पोलीस नाईक किशोर बठारे व इतर सहकारी पोलीस अंमलदार यांनी मोटारसायकल चालकाला अडविले. त्याची झडती घेतली असता त्याच्या गाडीच्या डिकीत 776 ग्रॅम वजनाचा 4, 08, 000 रुपये किंमतीचा चरस नावाचा अंमली पदार्थ आढळून आला. त्यानंतर मा. पोलीस अधीक्षक, आंचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाने तपास व या आरोपीवर गुन्हा दाखल करून आरोपीना अटक केली.
त्यांची चौकशी केल्यानंतर गुन्ह्यातील आणखी 4 आरोपींकडून 3 किलो ग्रॅमच्या 13, 80, 000 रूपये किंमतीचा चरस नावाच्या अंमली पदार्थासह अटक केले. तसेच, गुन्ह्यातील आणखी एकूण 13 आरोपी यांना अटक केले. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक-परशुराम कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक- विजयकुमार देशमुख, स्थानिक गुन्हा शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक – भास्कर जाधव, पोलीस उपनिरीक्षक- अविनाश पाटील, ट्राफीक पोलीस नाईक -किशोर बठारे, पोलीस हवालदार- हरी मेंगाळ, पोलीस हवालदार – जनार्दन गदमळे, पोलीस शिपाई – अंबिका महामुनी, पोलीस शिपाई – प्रियंका आहेर यांना या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
आपण या पुढे देखील अशीच उत्कृष्ट कामगिरी बजावत रहाल आणि रायगड पोलीस दलाच्या उज्ज्वल परंपरेत भर टाकाल, अशी मला खात्री आहे.
आंचल दलाल,
रायगड अलिबाग पोलीस अधीक्षक







