मुरुड पोलीसांना निवासस्थानाची प्रतीक्षा

Exif_JPEG_420

वसाहतीला 126 वर्ष पुर्ण; खोल्यांची दयनीय अवस्था

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड पोलीस ठाण्यातील बऱ्याच वर्षांपासून राहत्या चाळीची दुरुस्ती न केल्याने खोल्याची पडझड व जीर्ण होत गेली आहे. त्याची तातडीने दुरुस्ती करणे वा नव्याने नुतनीकरणे या प्रतिक्षेत पोलीस कर्मचारी आहेत.

या वसाहतीला 126 वर्ष पुर्ण झाली. या निवासी चाळीला सहा चाळी असुन यामध्ये 47 खोल्या आहेत. परंतू या खोल्यांची अवस्था दयनीय झाली आहे. पावसाळात तर या खोल्यांच्या छप्परामधून पाणी गळणे, खोल्या मधील असणाऱ्या खिडक्यांना गंज पकडला आहे. त्यात निखळलेले दरवाजे, भिंतीमधुन सारखा प्लास्टर पडत राहत असते. अशा अनेक गैरसोयीमुळे पोलीस कर्मचारी त्रस्त झाले आहेत. पोलीस चाळीचा नूतनीकरण कधी होणार असा सुर पोलिस कर्मचारी वृंदा कडून व्यक्त होत आहे. त्याच दुरावस्थेत असलेल्या खोलीत काही पोलीस कर्मचारी वास्तव करीत आहेत, तर काही कर्मचारी भांड्याने खोली घेऊन राहत आहेत.

पोलीस चाळीत चांगली सुविधा नसल्याने पोलीस कर्मचारी आपल्या वृध्द मातापित्यांना इच्छा असली तरी आणु शकत नाही. दुरवस्थामुळे अनेक खोल्या बंद अवस्थेत आहेत. तरी ही सार्वजनिक बांधकाम खात्याला जाग येत नाही. या नुतनीकरण करण्याकरिता अनेक प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याकडे दिले आहेत, यावर अजुन कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. या संदर्भात आम्ही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारी यांना विचारणा केली असता विधानपरिषदेचे शेतकरी कामगार पक्षाचे आ. जयंत पाटील यांनी 2022 या अधिवेशनातील आश्वासन क्रमांक 37 मुरुड पोलीस ठाणे रायगड येथील इमारत व पोलिस वसाहतीची पुनर्बांधणी व दुरुस्ती करण्याबाबत आ. जयंत पाटील यांनी आवाज उठवला होता.

Exit mobile version