ऑक्टोबर हिटने मुरुडकर बेहाल

। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।

मुरूड तालुक्यात सध्या ऑक्टोबर हिट वाढल्याने मुरुडकर बेहाल झालेले दिसून येत आहेत. दुपारी तापमान 32 सेल्सियसपर्यंत जात आहे. तसेच, बुधवारी (दि.9) पहाटे रिमझिम पाऊस देखील बरसत होता. या बदलत्या परिस्थितीमुळे कफ, सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णात वाढ झालेली आहे.

नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीला रविवारी सायंकाळी अचानक वादळी गडगडाटासह दोन तास पाऊस पडल्याने सर्वांचीभीतीने तारांबळ उडाली होती. परंतु, नंतर पुन्हा पाऊस गायब झाल्याने हवेतील तापमान वाढले आहे. तापमान पारा कमी जास्त होत असल्याने आजारी रुग्णांची संख्या वाढली आहे. विशेष करून खोकला, कफ, सर्दीने हैराण झालेले रुग्ण रुग्णालयात दिसून येत आहेत. ग्रामीण रुग्णालयात ओपीडीत उपचार घेणार्‍या रुग्णांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

Exit mobile version