निवडणुकांवरून मुरूडकर संभ्रमात

| मुरुड जंजिरा | सुधीर नाझरे |
कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसर्‍या लाटेचा धोका जाणवत असल्याने प्रशासनाने खबरदारी बाळगली आहे.त्यामुळेच निवडणूक आयोग यांनी ही खबरदारी म्हणुन निवडणूकीत वर निर्बंध आणलेत.यांचा फटका होणा-या सार्वत्रिक निवडणुकीला बसण्याची शक्यता आहे.मुरूड-जंजिरा नगरपरिषदेचा 26नोव्हेंबरला विद्यमान सद्स्यांचा कालावधी संपुष्टात येणार आहे; मात्र निवडणूक संदर्भात निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या अनुषंगाने कोणतीच प्रक्रिया सुरू केली नाही, अवधीही कमी राहिला आहे. त्यामुळे पालिकेवर प्रशासक नियुक्तीची दाट शक्यता आहे. आजुन पर्यत निवडणूक आयोगाने निवडणूकीची तारीख जाहीर न केल्याने राजकीय पक्ष ही संभ्रमात पडले आहेत. तरी ही पुढील काळात कधीही निवडणुका होऊ शकतात हे गृहीत धरून काही राजकीय पक्षांनी आतापासुन मोर्चेबांधणी सुरू करताना दिसत आहे.राज्य सरकारच्या आदेशनुसार यंदा होणा-या नगरपरिषद निवडणुकीकरिता प्रभाग रचनेत बदल करण्यात आले आहे.त्याअंनुषगाने मुरूड-जंजिरा नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणुक आता चार प्रभागा आयोजी दोन प्रभाग प्रमाणे निवडणूक होणार आहेत या प्रभाग रचनेबाबत सध्या नाक्या नाक्यावर आणि चौकांमध्ये नव्या प्रभागाच्या विषयाची चर्चा रंगु लागली आहे.
अद्याप निवडणुकीबाबत कोणत्याही सूचना किंवा कामकाज प्रशासनाकडून सुरू झाले नसले तरी इच्छुकांनी मात्र अंतर्गत मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

मागील प्रभागांपेक्षा नव्या प्रभागांची लोकसंख्या कमी होणार असल्यामुळे आधीच्या प्रभागांतून काही भाग वगळला जाणार असल्याचे गृहीत धरून इच्छुकांनी नागरिकांना बरोबर गाठी भेटी घेवुन आतुन जनसंपर्क सुरू केला आहे. एकीकडे विद्यमान नगरसेवक पुन्हा तिकीट पदरात पाडून घेण्यासाठी पक्षश्रेष्ठींची मर्जी राखण्याच्या प्रयत्नांत असुन तर पक्षश्रेष्ठींसमोर अस्तित्व दाखविण्यासाठी इच्छुक आणि विद्यमान नगरसेवक या दोघांचीही चढाओढ पाहताना मिळणार आहे. दुसरीकडे विरोधकांनीदेखील सत्ता मिळविण्यासाठी आतुन मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे सत्तेत आसलेले शिवसेना, कॉग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी असली तरी येणा-या नगरपरिषदेचे निवडणूकीत ही महाविकास आघाडी होतंय की बिघडतयं ते येणा-या निवडणूकीच्या वेळी कळणार आहे.सध्या कोणत्याच राजकीय पक्षांकडून सध्या तरी आरोप प्रत्यारोपांचे राजकारण तापले नसले तरी.यावेळी विरोधक सत्ताधारी शिवसेनेला खिंडीत गाठण्याचे प्रयत्न करणार. निवडणूक आयोगाने निवडणूकीचे वेळापत्रक जाहिर ने केल्याने ही निवडणूक सहा महिने पुढे जावू शकते कारण प्रभाग रचना, आरक्षण सोडत, मतदार यादी अद्ययावत करणे यांसारख्या कामासाठी बराच कालावधी म्हणजेच निवडणुकीआधी किमान सहा महिने लागु शकते असे मत राजकीय विश्‍लेषणचं आहे. सध्या तरी वेट अ‍ॅन्ड वॉच भूमिकेत राजकीय पक्ष आहेत.

Exit mobile version