शुभम यांच्या गायनाने मुरुडकर मंत्रमुग्ध

दत्तमंदिरात दत्तयाग व लघुरुद्र कार्यक्रम उत्साहात

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |

300 वर्षे परंपरा असलेले दत्त मंदिरात दरवर्षी दत्तयाग व लघुरुद्र हा कार्यक्रम होत आहे. सायंकाळी प्रसिध्द भजनसम्राट अभिनव गंधर्व पंडीत रघुनाथ खंडाळकर, लिटील चॅम्प विजेता शुभम खंडाळकर यांचे गायन झाले. भाजनातील बारकावे, ताल, लय, वादकांची शास्त्र शुद्ध माहिती पंडीत रघुनाथजी यांनी मुरुडकरांना दिली. शुभमच्या गायनाने मुरुडकर मंत्रमुगध झाले. त्यांना तबल्याची साथ सोहम गोराणे, पखवाज साथ साईराज गुरव यांनी साथ दिली. यावेळी पंडीत रघुनाथ खंडाळकर व शुभम खंडाळकर यांचा दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोद भायदे यांनी सत्कार केला. तसेच, सोबत आलेल्या वादकांचा सुध्दा सत्कार करण्यात आला. यावेळी कीर्ती शहा, विजय पाटील, सुधा पाटील, श्रीकांत सुर्वे आदी भजन प्रेमी उपस्थित होते.

Exit mobile version