| उरण | वार्ताहर |
दिवाळीच्या पहिल्या पहाटे उरणवासियांना संगीत नजराणा शिवसेना (श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे) उरणतर्फे माजी आमदार तथा रायगड जिल्हा प्रमुख मनोहर भोईर यांच्या संयोजनातून सोमवारी सकाळी दिवाळी पहाट या संगीत गायनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले होते. संगीत विशारद कीर्ती गोंधळी व रमेश गोंधळी यांच्या सुमधुर गायनाने उरणकर मंत्रमुग्ध झाले. त्यांना भास्कर म्हात्रे, गिरीश ठाकरे, महेश भाटे, केशव साळवी यांनी साथ देत विविध रागांमध्ये बंदिश-भक्तीगीते व भावगीते सादर करून उरणकरांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमाला माजी आमदार मनोहरशेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, गणेश म्हात्रे, मनोज पाटील, शहर संघटक दिलीप रहाळकर, नगरसेवक अतुल ठाकूर, मच्छिंद्र पाटील, जगजीवन भोईर, सुरेखा भोईर, जगजीवन नाईक, सचिन पाटील, रमेश गोंधळी, किरण पाटील व उरणवासी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी महेश गावंड यांनी आभार मानले.