| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड शहरातील लोकसंख्या वाढीबरोबर गाड्यांची संख्या तेवढीच झपाट्याने दिवसेनदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे गाडी पार्किंगकरिता जागा अपुरी पडत आहे. त्यात शहरातील रस्ते सर्व अरूंदे असल्याने वाहतूक कोंडीला स्थानिकांना सारखे सामोरे जावे लागत आहे. वाहतूक कोंडीपासून सामान्य नागरिकांना दिलासा कधी मिळणार? मोकळा रस्ता आम्हाला कधी मिळणार असा प्रश्न सामान्य नागरिक विचार आहेत. लोकप्रतिधीनी या वाहतूक कोंडीकडे लक्ष देऊन सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी सामान्य नागरिक करित आहे.