अनंत गीतेंना निवडून देण्याचा मुरूडकरांचा निर्धार

चित्रलेखा पाटील यांची प्रमुख उपस्थिती

| मुरूड | प्रतिनिधी |

आगामी रायगड लोकसभा मतदार संघातील इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराकरिता मुरूड तालुक्यातील काशिद, भोईघर, मांडला, बोर्ली, कोर्लई, राजपुरी, आगरदंडा, एकदरा, आंबोली, सावली, शिघ्रे, विहुर येथे बैठका घेण्यात आल्या.

यावेळी शेकापकडून जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शेकापचे ज्येेष्ठ नेते तुकाराम पाटील, विजय गिदी, वामन चुनेकर, रमेश दिवेकर, किशोर धामणकर, रिझवान फहीम, राहिल कडू, चंद्रकांत कमाणे, विक्रांत वार्डे तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून प्रमोद भायदे, नौशाद दळवी, प्रशांत मिसाळ, आदेश दांडेकर, काँग्रेसकडून इस्माईल घोले, अस्लम हळदे, इस्माईल शेख, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून हाफिझ कबले, नौशाद शाबान, मुझफ्फर सुर्वे आणि इतर प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांनी विविध ठिकाणी जाऊन गाठीभेटी घेतल्या.

इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना मशालीसमोरचे एक नंबरचे बटन दाबून विजयी करण्याचा निर्धार केला. यावेळी बैठकांना कार्यकर्त्यांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Exit mobile version