कर्जतमध्ये संगीत मैफलीने जिंकली रसिकांची मने

| कर्जत | प्रतिनिधी |
संजीवनी हॉस्पिटलच्या 43 व्या वर्धापनदिनानिमित्त संगीत मैफलीचे आयोजन केले होते. या मैफलीत गायकांनी हिंदी-मराठी जुनी, नवी गीते सादर उपस्थित रसिकांची मने जिंकली. डॉ. अरुण पाटील आणि डॉ. अंजली पाटील यांच्या संजीवनी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. अरुण पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात 1980 साली हे हॉस्पिटल सुरू केले. त्यावेळी अनेक मित्रांनी मला सहकार्य केले. त्यावेळचे सहकारी आजही उपस्थित आहेत. अनेकांना नवीन जीवन देण्याचे आमच्या सर्व टीमने केले आहे आणि अजूनही सातत्याने करीत आहे.फ असे स्पष्ट केले. रेखा मालपुरे यांनी कविता सादर करून डॉ. पाटील यांचा जीवनपट उलगडला.

चिमुकल्या दिया भानुशालीने इंग्रजी गीते सादर केली. तर सुज्ञ बोकील, अनिकेत घमंडी, अलका यादव यांनीही गीते सादर करून मैफलीत रंगत आणली. डॉ. अंजली पाटील यांनी प्रदर्शन केले. याप्रसंगी डॉ. ज्योती सातपुते, मनीषा सुर्वे, श्रद्धा गावडे, मधुसूदन मानकामे, संदीप मुळगावकर, मोहन कराडकर, सुरेश सरदेसाई, सुरेश महाजन, ऍड. शिरीष देशपांडे, संदीप फुलगावकर, नीता पिंगळे, शुभदा निमकर, चव्हाण आदी उपस्थित होते.

Exit mobile version