खारेपाट | वार्ताहर |
नवरात्रोत्सव निमित्त बहिरीचा पाडा येथे भवानी नवरात्रोत्सव मंडळ देऊळ आळी यांच्या विद्यमाने संगीत भजनाचा कार्यक्रम माणकुळे येथील भजनी कलावंत स्वराज पाटील आणि मंडळीने संगीत भजनाचा कार्यक्रम सादर केला.सदर भजनात लहान कलावंताने अभंग, गवळण, अभंग ,जोगवा, भैरवी,गजर विविध गायन करून रसिकांची मने जिंकली. त्याला पखवाज साथ पंढरीनाथ पाटील व सुंशात पाटील यांनी दिली.
व्यवस्थापक नवरात्र उत्सव मंडळाचे पदाधिकारी डॉ . मनोज पाटील .भरत पाटील, गुरुनाथ पाटील, विक्रंम पाटील व इतर सदस्य व महिला मंडळ व्यवस्थापन केले. सदर कार्यक्रमला प्रेमनाथ बुवा पाटील, सुनील म्हात्रे, दिनानाथ पाटील व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.