श्रीवर्धन | प्रतिनिधी |
कोकण मराठी साहित्य परिषद, मधुबन कट्टा, उरण यांनी कवी कै. भास्कर पाटील यांचे स्मरणार्थ प्रत्येक कवीने भास्कर पाटील यांच्या कवितांचे वाचन करुन आणि शिवाय स्वतःची कविता सादर करुन आईच्या बांगड्या या कै. पाटील यांच्यापुस्तकांतील कवितांनी आदरांजली वाहिली.
कवी अमोल म्हात्रे, संजीव पाटील, सी. बी. म्हात्रे, संजय होळकर, अरुण म्हात्रे, अजय शिवकर, भ. पो. म्हात्रे, रामचंद्र म्हात्रे, रायगड भूषण प्रा. एल. बी. पाटील आणि छंदोगामात्य मंचचे दादासाहेब मखमले इ. नी कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मोहनलाल म्हात्रे होते. ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत मुकादम, मारुती तांबे यांनी यावेळी आपले विचार मांडले. भगवान पोसू यांनी सूत्रसंचालन केले.