| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ खांडा येथील विद्या सोनावळे (47) या रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरासमोर नातेवाईकांसोबत गप्पा मारत उभ्या होत्या. त्यादरम्यान एक अल्पवयीन तरूण त्यांच्या बाजुला आला आणि त्याने अचानक विद्या सोनावळे यांच्या गळ्यात हात घालुन सोन्याचे छोटे मंगळसुत्र जोरात खेचले. मात्र, त्यांनी लगेचे गळ्यातील मंगळसुत्र धरल्याने ते त्यांच्याच हातात राहिले. त्यानंतर त्या तरूणाने तेथून पळ काढला. त्यानंतर विद्या सोनावळे यांनी जोरात आरडा ओरड केली. त्यावेळी गावातील काही तरूणांनी त्याची पाठ काढली आणि त्याला पकडून नेरळ पोलीस ठाण्यात नेले. या तरुणाचे मोहम्मद शाद अर्शाद अन्सारी असे असून, त्याच्यावर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







