| आगरदांडा | प्रतिनिधी |
आबीद हुसैन खॉ साहेब स्मृती संगीत सोहळा वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहात साजरा झाला. खॉ. साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दीप प्रज्वलनाने संगीत सोहळ्याचा प्रारंभ झाला. स्वरांगी पेंडसे या नवोदित गायिकेला गिरीजा कीर संगीत प्रेमी पुरस्कार, डॉ.श्रीकांत भावे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मिलिंद गोखले यांनी राग मुलतानी बडा व छोटा ख्याल आळवत उपस्थिताना मंत्रमुग्ध केले. योगेश नाईक गायकाने शास्रीय संगीतातील पुरिया धनाश्री बडा व छोटा ख्याल आणि राग सरस्वती छोटा ख्याल सादर केला. ज्येष्ठ गायक डॉ. रवीन्द्र नामजोशी यांनी सच्चे सुर आणि स्वर साधनेचा अविष्कार सादर केले.
रोहित भागवत, किशोर दांडेकर, साईराज गुरव, मिलिंद जोशी, अशोक देव यांनी त्यांना साथ दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उर्मिला नामजोशी यांनी केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. अनंत जोशी, गोविंद जोशी, शेखर मोने, सिध्देश लखमदे आदीनी परिश्रम घेतले.