| उरण । वार्ताहर ।
कर्नाटक येथे 9 ते 11 एप्रिल 2022 मध्ये साजरा झालेल्या लोककला महोत्सव-22 मध्ये पुन्हा एकदा बेस्ट परफॉर्मंन्सहा प्रथम क्रमांकाचा किताब मिळवून हॅटट्रिक साधून उरण तालुक्यातील भेंडखळ गावातील दत्ता भोईर आणि त्यांच्या समुहाने महाराष्ट्र राज्याचे नाव उज्वल केले आहे.भेंडखळ गावाचे दत्ता भोईर आणि त्यांच्या कलाकार समूहांला या मोहोत्स्वात कोळी व लावणी ही लोककला सादर करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात आली होती. या स्पर्धेत संपूर्ण देशांतून 25 राज्यांनी सहभाग घेतला होता. कर्नाटक उडपी येथे दक्षीण कन्नडा मोगवीरा महासंघ उडपी यांच्या वतीने महालक्ष्मी उत्सव इंटर झोनल लोककला मोह्त्स्व-2022 आयोजित करण्यात आला होता. भारतामधून 25 राज्यानी या महोत्सवात सहभाग घेतला होता.महाराष्ट्राच्या वतीने नाखवा माझा दर्याचा राजा या कार्यकमांतर्गत कोळी व लावणी नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले होते. बेस्ट परफॉर्मंन्सहा प्रथम क्रमांकाचा किताब नाखवा माझा दर्याचा समुहाने मिळवून हॅटट्रिक साधली आहे.