मायनाक भंडारी चषक 2024

मुद्रा 11 कातळपडा श्रीवर्धन विजेता

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |

भंडारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था, अलिबागच्या वतीने राज्यस्तरीय मायनाक भंडारी चषक 2024 पर्व 3 या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलच्या पटांगणावर 9 ते 10 फेब्रुवारी 2024 दरम्यान संपन्न झाली. स्पर्धेचे उद्घाटन नाना तोडणकर, सुरेश खोत, प्रशांत जाधव, संजय राऊत, समिहा पाटील, दुर्वा पारकर, निलेश खोत यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेमध्ये राजन नार्वेकर, निखिल मयेकर, संदीप खोत, स्पृहा पाटील, राजेंद्र खडपे, कल्पेश खवणेकर, निलेश तवसाळकर, अभिषेक पेडणेकर ह्या संघ मालकांच्या एकूण आठ संघांनी सहभाग नोंदवला होता. राज्यातील नावाजलेले 120 खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेत मुद्रा 11 कातळपाडा पुरस्कृत भंडारी किंग्ज श्रीवर्धन हां संघ अजिंक्य ठरला. तर द्वितीय क्रमांक स्पृहा 11 किहीम पुरस्कृत भंडारी फायटर्स पालघर व तृतीय क्रमांकाचा मानकरी आर्या स्पोर्ट्स दापोली ठरला. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थात मालिकावीर म्हणून स्पृहा 11 किहीम पुरस्कृत भंडारी फायटर पालघर संघाचा भाग्येश ठाकूर तर उत्कृष्ट फलंदाज मुद्रा 11 भंडारी किंग श्रीवर्धन संघाचा शुभम मांजरेकर, उत्कृष्ट गोलंदाज ”भंडारी फायटर्सफफ स्पृहा 11 किहीम संघाचा विकी मोरे यांची निवड करण्यात आली. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक 1,00,000 रूपये अलिबागमधील उद्योगपती, दानशूर व्यक्तीमत्व श्री. राजनभाई नार्वेकर यांनी दिले.” द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक 50,000 रूपये प्रशांत चिंबुलकर यांनी दिले तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक 25,000 रुपये नागाव नगरीचे माजी सरपंच नंदू मयेकर यांनी दिले. मालिकावीर फ्रिजचे बक्षिस अश्विनकुमार पाटील यांनी तर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज साठी सायकली सचिन कदम यांनी व स्पर्धेतील आकर्षक चषक साईल पाटील यांच्या कडून तसेच प्रत्येक सामन्यातील सामनावीर चषक विलास आंब्रे यांनी दिली.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष दर्शन पारकर, अश्विनकुमार पाटील, अक्षय गुळेकर, प्रशांत चिंबुलकर, साईल पाटील, विलास आंब्रे, सचिन कदम, अल्का तोडणकर-कोळी, प्रेरणा भाटकर, कल्पेश खवणेकर, प्राचिन चिंबुलकर यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version