एन. सी. सी. कॅडेट ची 26 जानेवारी राजधानी दिल्ली येथे राजपथावर, कुमार स्मित म्हात्रे दिवलांग पेझारीचा जाणार दिल्ली येथे
| भाकरवड | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत आंबेपुर हद्दीतील ना.ना. पाटील हायस्कूलचा इयत्ता नववीमध्ये शिकणार विद्यार्थी स्मित अमोल म्हात्रे याची यावर्षी 26 जानेवारी रोजी राजधानी दिल्लीत राजपथावर होणाऱ्या एनसीसी संचलनासाठी निवड झाली आहे. त्याच्या निवडीने हायस्कूलमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

राष्ट्रीय स्तरावर आरडीसी (रिपब्लिक डे कॅम) साठी निवड होण्याची प्रक्रिया ही अतिशय कठीण असून, त्याकरिता विद्यार्थ्यांना अपार मेहनत व कष्ट घ्यावे लागतात. स्मित म्हात्रे याने रिपब्लिक डे कॅम्पमध्ये निवड होण्याकरिता सर्व अडथळे व आव्हाने पार करीत मोठे लक्ष गाठले आाहे. संपूर्ण महाराष्ट्रातून एनसीसी ज्युनिअर डिव्हिजन (आर्मी) मधून फक्त 9 कॅडेटची निवड प्रजासत्ताकदिनी राजपथावर होणाऱ्या संचलनामध्ये निवड केली जाते. संपूर्ण महाराष्ट्रातून रिपब्लिक हे कॅम्प साठी आर्मी, नेव्ही, एअर फोर्स शाखामधून फक्त 122 कॅडेटची निवड केली जाते. स्मितच्या निवडीने शाळेबरोबरच रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
मागील वर्षीदेखील शाळेतील जय महेश पाटील व गौरव दत्तेश डिंगणकर या एनसीसी कॅडेटची निवड प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्ली येथे राजपथावर होणाऱ्या संचालनामध्ये झाली होती. राजधानी दिल्ली येथे दि. 29 डिसेंबर 2023 ते 29 जानेवारी 2024 पर्यंत रिपब्लिक डे कॅम्प असून, स्मिथ त्यात सहभागी होण्यासाठी दिल्लीत रवाना झाला आहे. या कॅडेटला 6 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मनीष कुमार, ए.ओ. कर्नल आशिष कुमार, सुभेदार मेजर जर्नल सिंग, संपूर्ण पीआय स्टाफ, शाळेचे एनसीसी ऑफिसर समाधान भंडारे, मुख्याध्यापक शशिकांत पाटील, सर्व शाळेतील सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले.