ना.ना.पाटील हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर त्त्यांच्यातील सुप्त

| पेझारी | वार्ताहर |

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर त्त्यांच्यातील सुप्त गुणांची त्यांना जाणीव करून देणे, त्यांना वाव देणे व विकास घडवून आणणे हा प्रमुख उद्देश समोर ठेवून को ए.सो ना.ना. पाटील संकुल पोयनाड येथे चेअरमन पंडित पाटील यांच्या संमतीने, मुख्याध्यापक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 11 ते 19 डिसेंबर या कालावधीत कला-क्रीडा-सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 11 ते 13 डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांच्या गटवार विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. पुढे 14 डिसेंबर रोजी राजिप माजी सदस्या तथा को.ए.सो पिरोजबाई बारिया प्राथमिक शाळेच्या चेअरमन डॉ. चित्रा पाटील व आंबेपूर सरपंच सुमना पाटील यांच्या हस्ते वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.

याच दिवशी पिरोज बाई बारिया प्राथमिक शाळेचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर करण्यात आले. दि. 15 डिसेंबर रोजी फनी गेम्स व स्टॉल लावण्यात आले आणि संध्याकाळी इंग्रजी माध्यम पेझारी यांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम संपन्न झाले. 16 डिसेंबर रोजी पारंपरिक वेशभूषा स्पर्धा व संध्याकाळी नाना पाटील हायस्कूल व जुनिअर कॉलेज पोयनाड यांचे बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. 18 डिसेंबर, सोसायटी डे दिनी विविध स्पर्धांमधील पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी राजिप माजी सदस्या भावना पाटील, को. ए. सो माजी अधिकारी के. डी.म्हात्रे, शाळा समिती ज्येष्ठ सदस्य यशवंत गुरुजी, स्वप्निल पाटील, सुनील राऊत,राजन पांचाळ, पी.जी. भगत, डॉ. श्रीकांत पाटील, माजी मुख्याध्यापिका भारती हळदवणेकर, औदुंबर रणदिवे, पांडुरंग पाटील, धारणी भगत, सौ राऊत, सुरेंद्र टेमकर संकुलातील सर्व शाखांचे प्रमुख, सत्र प्रमुख, आजी-माजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

स्नेहसंमेलनांतर्गत झालेल्या विविध उपक्रम/कार्यक्रम यांचे निवेदन सायली पाटील, तुकाराम बर्गे, रेश्मा पाटील यांनी केले. पारितोषिकांचे वाचन राजेश स्वामी, सुवर्णा पाटील यांनी केले. कला-क्रीडा सांस्कृतिक महोत्सव यशस्वी होण्यासाठी राजेंद्र म्हात्रे, स्नेहसंमेलन अध्यक्ष देवेंद्र पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सत्र प्रमुख तृप्ती पिळवणकर, उदय पाटील, समीर भोईर, समाधान भंडारे, पुरुषोत्तम पिंगळे, संजय डोंगरे, प्रसन्न राठोड, सुनील पाटील, अविनाश पाटील, गोसावी, अनिल पाटील, निनाद पाटील, एनसीसी, आर एस पी पथके, संगीत कला पथक तसेच या सर्वांना मार्गदर्शन करणारे त्यांचे मार्गदर्शक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनीही सर्व उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन हा आनंदोत्सव साजरा केला.

Exit mobile version