| श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धन येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास बंगलोर येथील नॅक अर्थात राष्ट्रीय मूल्यमापन व मूल्यांकन समितीने भेट दिली. या तज्ञ समितीमध्ये डॉ. रमेश चंद्रा (कुलगुरु,दिल्ली), डॉ. शिल्पी वर्मा व डॉ. अनुराधा रॉय यांचा समावेश होता. त्यांनी सर्व विभागातील प्रगतीचा अहवाल पीपीटीद्वारे सादर केला. 2017-18 ते 2021-22 या मागील पाच वर्षांच्या कामकाजाचे सूक्ष्मपणे मूल्यमापन केले. तसेच महाविद्यालयातील माजी विद्यार्थी व पालक, आजी विद्यार्थी, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांच्याशी स्वतंत्रपणे संवाद साधून अनेक प्रश्नांच्या माध्यमातून पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचा-यांच्या समस्या , अपेक्षा, अडचणी व वस्तुस्थिती समजावून घेऊन गोखले महाविद्यालयास नॅकचे मबफ मानांकन देण्यात आले. नॅक यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ. श्रीनिवास जोशी, डॉ.वाल्मिक जोंधळे, डॉ.निलेश चव्हाण, डॉ. कल्याणी नाझरे, प्रा.पंकज गमे,प्रा. सागर कुंभार, उपप्राचार्य किशोर लहारे, डॉ. योगेश लोखंडे, प्रा. संतोष लंकेश्वर, डॉ. विलास व्हनकट्टे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी विशेष परिश्रम घेतले.







