दुखापतीमुळे नदालची माघार

मेदवेदेव्हचा दुसर्‍या फेरीत प्रवेश
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालने एटीपी टोरोंटो मास्टर्स स्पर्धेतून माघार घेतली आहे. डाव्या पायाच्या दुखापतीमुळे नदालला हा निर्णय घेणे भाग पडले. तसेच या महिन्याअखेरीस होणार्‍या अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेतील त्याच्या सहभागाबाबतही साशंकता निर्माण झाली आहे. जागतिक क्रमवारीत तिसर्‍या स्थानी असलेल्या नदालचा टोरोंटो मास्टर्स स्पर्धेतील सलामीचा सामना दक्षिण आफ्रिकेच्या लॉईड हॅरिसविरुद्ध होणार होता. परंतु, या सामन्याच्या एक दिवसआधीच त्याने स्पर्धेतून माघार घेतली. हॅरिसनेच मागील आठवड्यात वॉशिंग्टन येथे झालेल्या स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीत नदालला पराभवाचा धक्का दिला होता.

Exit mobile version