लेजेंड इलेव्हन क्रिकेट संघ खामगाव विजयी
| महाड | प्रतिनिधी |
कोकणातील नाडकर परिवार शहरात विविध ठिकाणी वास्तव्यास असणारा कुटुंबातील सदस्य एकत्रित येत नाडकरांचा राजा कुलस्वामीनी 2025 चषकांचे आयोजन केले होते. या स्पर्धा बादशहा मैदान भाईंदर येथे एकदिवसीय सामन्यात 16 संघानी सहभाग नोंदविला होता, यामध्ये लेजेंड इलेव्हन क्रिकेट संघ खामगाव यांनी प्रथम वर्षी चषकांचा मानकरी ठरले.
याप्रसंगी निलेश पाष्टे, भगवान शिर्के, प्रणय नाडकर, तन्वी भुवड, शुभ्रा वाघे,ऋषभ खेर, भरत मोरे, यश्वि नाडकर, कविता लोले, सुरेश सावंत, रियांश गोरीवले, मनन भुवड, रुपाली भावे, ओवी वेळुंडे, श्वेता शिगवण, भूमिका पाष्टे, समालोचक अजित आर्डे, पंच उमेश सुर्वे, निलेश धामणे, विनायक शिर्के यांनी सहकार्य केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजक रुपेश नाडकर, अभी नाडकर, आशिष नाडकर, अमय नाडकर, नागेश नाडकर, स्वप्निल नाडकर, रोहन नाडकर, कशिष नाडकर, गौतम नाडकर, रुचिक नाडकर, सुयोग नाडकर, मयूर पाष्टे, व्यवस्थापक नाडकर परिवार, संदेरी ग्रामस्थ मंडळ व नाडकर परिवार दाभोळ, कोकरे, लिपनिवावे, आमशेत, खामगाव आदींनी स्पर्धेसाठी मेहनत घेतली. अंतिम सामन्यात लेजेंट इलेव्हन क्रिकेट संघ खामगाव प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तर श्री गणेश क्रिकेट संघ वीर सदर स्पर्धेचा उपविजेता, तर तृतीय क्रमांक जे.के.इलेव्हन क्रिकेट संघ खारगांव, चतुर्थ क्रमांक राधाकृष्ण क्रिकेट संघ खामगाव गौळवाडी यांनी चषकावर नाव पटकावले तसेच उत्कृष्ट फलंदाज परेश शेळके, उत्कृष्ट गोलंदाज राज, मालिकावीर प्रतिक कदम किताब पटकावला, सदर विजेता संघाला मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
