| उरण | प्रतिनिधी |
‘प्रदूषण आत असो किंवा बाहेर, दोन्हीही हानिकारक आहेत’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवत संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन यांच्या माध्यमातून उरण तालुक्यातील नागाव समुद्रकिनारी भव्य सफाई मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत जवळपास 600 स्वयंसेवकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवत किनारपट्टी स्वच्छ केली.
देशभरात रविवारी (दि.22) ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानांतर्गत जवळपास 2 हजार ठिकाणी जलाशय सफाई मोहीम हाती घेण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून उरणमधील नागाव समुद्रकिनारा येथे मोठ्या प्रमाणावर स्वच्छता अभियान पार पडले. मोहिमेदरम्यान प्लास्टिक, काच, थर्माकोल व इतर घनकचऱ्याचा मोठा साठा गोळा करण्यात आला. ही मोहीम संत निरंकारी मिशन अंतर्गत, संत निरंकारी चारिटेबल फाऊंडेशनच्या आयोजनातून, सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या प्रेरणेने पार पडली.
नागाव समुद्रकिनारी सफाई मोहीम
