नागावच्या सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांनी पदभार स्वीकारला

| रेवदंडा | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यात सर्वाधिक मतांच्या आघाडीने नागाव ग्रामपंचायतीवर थेट सरपंचपदी निवडून गेलेल्या हर्षदा निखिल मयेकर यांनी पदभार स्वीकारला तर उपसरपंचपदी सुरेंद्र नागलेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नागाव ग्रामपंचायतीच्या प्रांगणात झालेल्या सत्कार व अभिनंदन कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य व्दारकानाथ नाईक, शेकापक्षाचे तालुका चिटणीस अनिल पाटील, नागाव ग्रा.प. माजी सरपंच नंदु मयेकर, आदी मान्यवर मंडळीची उपस्थिती व्यासपिठावर होती. तसेच सरपंच हर्षदा मयेकर, उपसरपंच सुरेंद्र नागलेकर, सदस्या प्रियंका काठे, सदस्या निकिता पाडेकर, सदस्य अनिरूध्द राणे, सदस्या रोहिणी घरत, सदस्या विणा विकास पिंपळे, सदस्या मंगळा रविंद्र नागे, सदस्य आदेश आंबाजी मोरे, सदस्या लिना दिलिप म्हात्रे, सदस्य निखिल नंदकुमार मयेकर, सदस्या सुप्रिया संजय म्हात्रे, सदस्य परेश एकनाथ ठाकूर, सदस्य सुरज चंद्रकांत म्हात्रे, सदस्य रोहन रामचंद्र नाईक, सदसया अंकिता चेतन शेवडे यांची सुध्दा उपस्थिती होती.

मतदारांनी दाखविलेल्या विश्‌‍‍‍वासास तडा जाऊ देणार नाही, नागावच्या सर्वागिण विकासासाठी तत्पर राहून नागावचे नाव जागतिक पातळीवर पोहचविण्याचा निश्चित प्रयत्न राहणार आहे, असे सरपंच हर्षदा मयेकर यांनी सांगितले.

Exit mobile version