नागेश्‍वर आवास संघ विजयी

| सोगाव | वार्ताहर |

अलिबाग तालुक्यातील चोंढी येथे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने नवयुवक कबड्डी संघ आयोजित प्रसाद (पिंट्या) गायकवाड मित्र मंडळ, चोंढी आणि युवा एकता जनकल्याण संस्था पुरस्कृत स्व. मधुकर ठाकूर (पप्पा) स्मृतिचषक 2023 च्या पंचक्रोशीतील मुला-मुलींच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नागेश्‍वर आवास संघाने नवयुवक चोंढी संघाचा पराभव करुन चषकावर नाव कोरले.

तत्पूर्वी, दि. 7 मे रोजी महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.चे उपाध्यक्ष तथा खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, रवींद्र ठाकूर, कविता ठाकूर, अमीर (पिंट्या) ठाकूर, काका ठाकूर, प्रभाकर राणे, उमेश ठाकूर, समीर ठाकूर, चारुशेठ मगर, अमित नाईक, डॉ. किरण शेट्ये, जयेंद्र मोरे, प्रतिभा वेलणकर, पो. पाटील प्रीती गायकवाड, रश्मी राऊत, पप्या दळवी, विजय भोईर, मिस युनिव्हर्स इंडिया विजेती अपूर्वा प्रवीण ठाकुर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांचे प्रसाद (पिंट्या) गायकवाड यांनी शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. या स्पर्धेत मुलांच्या संघात नागेश्‍वर आवास संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक नवयुवक चोंढी संघाने पटकावला, तसेच तृतीय क्रमांक जय गणेश धोकवडे संघाने पटकावला आणि चतुर्थ क्रमांक झिरेश्‍वरी झिराडपाडा संघाने पटकावला. तसेच स्पर्धेत मुलींच्या संघात प्रथम क्रमांक भिलेश्‍वर किहीम संघाने पटकावला, तर द्वितीय क्रमांक टाकादेवी मांडवा संघाने पटकावला, तसेच तृतीय क्रमांक हिरकणी गडब् संघाने पटकावला आणि चतुर्थ क्रमांक ओमसाई कोळवे संघाने पटकावला.

मुलांमध्ये उत्कृष्ट चढाई- अंश धोनशेकर जय हनुमान धोकवडे संघ, उत्कृष्ट पकड- जय घरत झिरेश्‍वरी झिराडपाडा, सर्वोत्कृष्ट खेळाडू- प्रथमेश नाईक नागेश्‍वर आवास संघ, पब्लिक हिरो- हर्षल गायकवाड नवयुवक चोंढी संघ यांना देण्यात आले. तर, मुलींमध्ये उत्कृष्ट चढाई- प्रीती कडवे टाकादेवी मांडवा संघ, उत्कृष्ट पकड- राधिका मोकल हिरकणी गडब संघ, सर्वोत्कृष्ट खेळाडू- चैत्राली म्हात्रे भिलेश्‍वर किहीम संघ, पब्लिक हिरो- रेशमी पाटील ओम साई कळवे यांना देण्यात आला. सर्व विजेत्या संघांना व उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे सूत्रसंचालन अजित हरवडे यांनी केले. स्पर्धा पाहण्यासाठी कबड्डी शौकिनांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी नवयुवक कबड्डी संघ, पिंट्या गायकवाड मित्रमंडळ आणि युवा एकता जनकल्याण संस्थेचे कार्यकर्ते व ग्रामस्थ चोंढी यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version