। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने 49 वी जलतरण व वॉटर पोलो स्पर्धा नुकतीच भुवनेश्वर (ओडिसा) येथे पार पडली. भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या मुलीच्या वॉटर पोलो संघाने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तसेच मुलांच्या वॉटर पोलो संघाने तृतीय क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेतील सर्व विजेत्या खेळाडुंचे सर्व स्थरातून अभिनंदन होतेय.
महाराष्ट्र संघ मुले खेळाडूंची नावे खालील प्रमाणे सुजल भोय, प्रेम पाटील, रोहित कुथे, सार्थक इंद्रे, आदर्श म्हात्रे, दीनांशू कुथे, प्रयाग जैस्वाल, स्वयं परदेशी, कुश परतानी, अर्जुन देशमुख, यश दत्तानी, यदनेश बुगडले, लव परातानी यांचा समावेश होता. तर मुलीचा वॉटर पोलो संघात प्रेषिता तरे, श्वेता कुराडे, पूर्वा गावडे, श्रावणी सपाटे, जस्मित्कुर राहाल, सृष्टी भोसले, स्वरा पाटील, याना अग्रवाल, मित्वी दत्तनी, नीम शुक्ला, पल्लवी गुडला, श्रकानी अग्रे, दिशा यादव आदींचा समावेश होता.
या सर्व खेळाडूंना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दत्ता तरे, गितेश कुथे, रोशन कुथे, प्रेमराज पिंगळे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. रिलायन्स नागोठणे विभागाचे अध्यक्ष शशांक गोयल, विनायक किलोस्कर, उदय दिवेकर, इस्टेटचे मॅनेजर अजिंक्य पाटील, सतीश पाटील, अशोक विधाते, श्री. पाठक आदींनी भविष्यातील यशस्वी क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.