। मुंबई । प्रतिनिधी ।
नागपूर- मुंबई द्रुतगती समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या 520 किमी टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी होणार आहे. हा महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी अंतर 10 तासांऐवजी 5 तासांत कापता येईल.
यापूर्वी अनेकदा समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाच्या तारखा ठरुनही विविध कारणांमुळे लोकार्पण सोहळा लांबणीवर पडत होता. मात्र डिसेंबरच्या 11 तारखेचा मुहूर्त अंतिम झाला असल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली आहे.