| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पनवेल, उरण परिसरात येऊ घातलेल्या नैना प्रकल्पाविरोधात आवाज उठविण्यासाठी शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी आ. बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि.3) पनवेल ते आझाद मैदान पायी दिंडी काढण्यात आली.
सिडकोच्या नैना प्रकल्पा विरोधात आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी मुबंई येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशना दरम्यान मंत्रालयावर धडक देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी कामगार पक्षाने जाहिर केलेल्या निर्णयानुसार गुरुवारी पनवेल येथून आंदोलकांनी मंत्रालयाकडे कूच केली असून, पायी निघालेल्या आंदोलनात हजारो ग्रामस्थ भर पावसात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.