। तळे । वार्ताहर ।
‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ असा ज्ञानाचा दिवा लावण्याचा अमृतमय संदेश संपूर्ण ईश्वरा देणारे श्री संत श्रेष्ठ शिरोमणी नामदेव महाराज यांचा 674 वा संजीवन समाधी सोहळा श्री देव राधाकृष्ण मंदिर तळा येथे संपन्न झाला.
यावेळी राज्य रक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून डॉ. दीपक गोसावी यांचे नेतृत्वाखाली रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी 45 रक्तदात्यांनी रक्तदान केले यामध्ये महिलांचाही समावेश होता. यासाठी युवक मंडळाने परिश्रम घेतले. सायंकाळी गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त, विशेष कार्य करणार्यांचा सन्मान व महिला मंडळाचे मंडळांनी घेतलेल्या स्पर्धांचे पारितोषिक वितरण, असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम मंडळाचे पदाधिकारी सदस्य, समाज बांधव, महिला मंडळ पदाधिकारी महिला वर्ग युवक मंडळ पदाधिकारी सदस्य आणि शालकारी व्यवस्थापक निलेश पांढरकामे व अमृता पांढरकामे यांनी खूप परिश्रम घेतले.