खारघरमधील रस्त्याला दत्तूशेठ पाटील यांचे नाव द्या

शेकापचे अजित अडसुळे यांची मागणी

| पनवेल | प्रतिनिधी |

पालिका हद्दीतील खारघरमधील सेक्टर 27 परिसरातील रस्त्याला माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांचे नाव द्या, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे तालुका उपाध्यक्ष अजित अडसूळे यांनी केली आहे. तसेच, या मार्गाला एस.बी. सोमाणी यांचे नाव देण्याच्या पालिकेने केलेल्या ठरावालादेखील त्यांनी विरोध दर्शवला आहे.

खारघर वसाहतीमधील सेक्टर 27 परिसरात बी.डी. सोमाणी इंटरनशनल शाळेपासून 45 मीटर रुंदीच्या रस्त्याला शाळेपर्यंत एस.बी. सोमाणी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पालिकेने संमत केला आहे. पालिकेच्या या निर्णयाला पालिका हद्दीतील स्थानिकांकडून विरोध होत असून, अडसुळे यांनीदेखील या प्रस्तावाला विरोध दर्शवत माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली आहे.

Exit mobile version