शेकापचे पंतप्रधानांना निवदेन
। ठाणे । प्रतिनिधी ।
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दिवंगत दि.बा.पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाकडून करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर संबंधित आशयाचे पत्र शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हा चिटणीस प्रसाद साळवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरी विमानउड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना भारतीय डाक विभागामार्फत पाठविले आहे.
या निवेदनाच्या प्रारंभीच, महाराष्ट्रातील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण करण्याच्या संदर्भात अनेक चर्चा किंवा बातमी सुरु आहेत. या अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे आपले लक्ष वेधून घ्यायचे आहे, असे सांगून आपला मानस स्पष्ट केला आहे. तर, आम्ही भूमिपुत्र शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने लोकनेता दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी करण्यात असल्याचे नमूद केले आहे.
यासंदर्भात शेतकरी कामगार पक्षाची भूमिका विस्ताराने मांडताना, लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली जासई, नवी मुंबई येथील आंदोलनाच्या परिणामी झालेल्या कायद्यामुळे नवी मुंबई व्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्र व देशातील सिडको व इतर प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना 12.5 टक्के विकसित जमीन देण्यात आली आहे. याशिवाय, दिबांनी महाराष्ट्र-कर्नाटक सिमा आंदोलनादरम्यान 1 वर्षाचा तुरुंगवासही भोगला आहे. आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही. बा. पाटील यांचे महत्त्वाचे योगदान असल्याचे नमूद केले आहे.
याशिवाय दि.बा.पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीबाबत सांगताना, दिबांनी पनवेलमधून नगराध्यक्ष, पनवेल उरण विधानसभा मतदारसंघातून 4 वेळा, रायगड लोकसभा मतदारसंघातून 2 वेळा खासदार आणि महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अशी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे त्यांच्या धडाकेबाज कार्यामुळे त्यांना सर्वोत्कृष्ट संसदपटूचा किताबही मिळाला असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
अशाप्रकारे दिबांची पार्श्वभूमी स्पष्ट केल्यानंतर या निवेदनात, अनेक शासकीय प्रकल्प जनतेच्या सेवेसाठी आहेत. आमच्या जमिनींचा त्याग करून आम्ही मुंबई, नवी मुंबई, ठाणे अशी जागतिक दर्जाची शहरे उभारण्यास मदत केली आहे. त्यामुळे देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी ज्या व्यक्तीने आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. दिबांचे नाव हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्त्वाचा अभिमान ठरावा. असे म्हटंले आहे.
तसेच ही आम्हा स्वदेशी भूमिपुत्र शेतकर्यांची भावना आहे. मात्र ठाो जिल्ह्यात महाराष्ट्राच्या राजकारणातील उच्चपदस्थ नेत्यांच्या मनात आपल्या समाजाचा द्वेष असल्याने ते आमची मागणी धुडकावून लावण्यासाठी अन्य नेत्यांची नावे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याचा प्रस्ताव सरकारसमोर ठेवत आहेत. यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या असून, त्याबद्दल समाजात तीव्र संताप असल्याचे वास्तव या निवेदनात मांडण्यात आले आहे.
या निवेदनाअंती, जनभावनेचा आदर करून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेता द्या, अशी आम्ही या पत्राद्वारे सरकारला विनंती करतो.दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे व इतर कोणाचेही नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे, या मागणीला आम्ही सर्व मुलनिवासी भूमिपुत्र शेतकरी एकमताने विरोध करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.