नवमतदारांसाठी नाव नोंदणी कार्यशाळा

उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे यांनी केले मार्गदर्शन
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रायगड आयोजित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2022 अंतर्गत प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या सहकार्याने स्पर्धा विश्‍व अकॅडमी अलिबाग येथील युवक-युवतींसाठी नवमतदार नाव नोंदणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी प्रमुख मान्यवर म्हणून स्नेहा उबाळे उपजिल्हाधिकारी निवडणूक या उपस्थित होत्या. स्नेहा उबाळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आपली लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व पात्र नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवणे गरजेचे आहे शिवाय येणार्‍या विविध निवडणूकामध्ये आपला मतदानाचा अधिकार बजावणे. नव मतदारांनी आपले पहिले मत वाया घालवू नका. तसेच नव मतदारांना कुठे नोंदणी करता येते, नोंदणी करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे इत्यादी विषयी संपूर्ण माहिती दिली. यावेळी मतदार डिस्ट्रिक्ट युथ आयकॉन तथा प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी नंदकुमार गोंधळी, स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तथा स्पर्धा विश्‍व अकॅडमीच्या संचालिका सुचिता काशिनाथ साळवी, बार्टीच्या समतादूत अनुजा पाटील, अंकित पाटील आदी उपस्थित होते.

Exit mobile version