| अलिबाग । वार्ताहर ।
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रायगड-अलिबाग डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशान्वये व उपजिल्हा निवडणूक अधिकारी रायगड-अलिबाग श्रीमती स्नेहा उबाळे, उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी 189 कर्जत विधानसभा मतदार संघ अजित नैराळे यांच्या सूचनेप्रमाणे तसेच तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी खालापूर आयुब तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर येथील विश्वनिकेतन महाविद्यालय कुंभिवली व तहसिल कार्यालय खालापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 18 वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नुकतेच मतदार नोंदणी शिबिर संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी तहसिल कार्यालय खालापूर येथील नायब तहसिलदार निवडणूक दशरथ भोईर, प्रा. श्री.पाटील, प्रा. एच आर.मावकर, निखिल कासार तसेच तलाठी श्री.सरगर हे उपस्थित होते.