मुंबई विद्यापीठाचा महत्वचा निर्णय
। मुंबई । वार्ताहर ।
मराठीचं महत्व वाढविण्यासाठी मुंबई विद्यापीठाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता मुंबई विद्यापीठातर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांचे नामफलक मराठीत असणार आहे. महाविद्यालयांमध्ये मराठी भाषेला अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी विद्यापरीठाने परिपत्रक काढत या निर्णयाची घोषणा केलीये
परिपत्रकातील आदेश
- सहज दृष्टोत्यतीस येईल अशा पध्दतीने महाविद्यालयाचे नाव दर्शनी भागात मराठीत असावेत.
- महाविद्यालयाचे माहितीपुस्तक व प्रवेश अर्ज मराठी मध्ये सुध्दा उपलब्ध करून देण्यात यावेत.
- महाविद्यालयांच्या पत्रव्यवहारात प्राधान्याने मराठीचा वापर करण्यात यावा.
- महाविद्यालयांच्या सूचना मराठीतून लिहिण्यास प्राधान्य देण्यात यावे.
- कार्यशाळांमध्ये प्राधान्यवे मराठीचा वापर करण्यात यावा.
- मराठी भाषा गौरव दिवस 27 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात यावा. विविध चर्चा सत्रे, स्पर्धा यांचे आयोजन करण्यात यावे.