| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आई मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे रविवारी (दि. 29) पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 90 वर्षांच्या होत्या. मीराबाई पटोले यांच्या पार्थिवावर दुपारी 2 वाजता भंडारा जिल्ह्यातील सुकळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच स्थानिक नागरिक आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सुकळी येथे उपस्थित होते. महाराष्ट्रातील विविध राजकीय नेत्यांनी मीराबाई पटोले यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पटोले कुटुंबियांना आधार देण्यासाठी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.