| पेण | वार्ताहार |
पेण एज्युकेशन सोसायटीची श्री द. पां. तथा नाना टिळक प्राथमिक विद्यालय वावोशी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड मंगेश नेने पेण एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात ईशस्तवन व स्वागत गीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका विद्या घरत यांनी करून शाळेच्या वर्षभरातील प्रगतीचा अहवाल सादर केला. विविध स्पर्धा परीक्षेत सुयश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शालेय विद्यार्थीनी प्रांजल बोर्डेकर , जान्हवी सावंत व मानसी केदारे तर आभार संकीर्णा पाटील यांनी केले. यावेळी सुजितकुमार पिंगळे, वसंत आठवले, प्रशांत ओक, डॉ. निता कदम, हेमा राजे, हेमांगी बामुगडे, संगीता पाटील, मनोहर म्हात्रे, विद्या घरत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्या शेट्ये, रंजना भऊड, सुलभा राजपूरकर, सुनिल पवार, दर्शना यादव आदीनी विशेष मेहनत घेतली.







