नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात

स्वच्छ,सुंदर चिपळूणसाठी सरसावले श्रीसदस्य
श्री सदस्यांनी शेकडो टन कचरा उचलला

| चिपळूण | प्रतिनिधी |
नेहमी शांत वाहणारी वाशिष्टी नदी मागील आठवड्यात कमालीची कोपली आणि तिच्या रौद्ररुपाने स्वच्छ,सुंदर चिपळूणनगरीची पुरती वाताहात झाली.त्या जलप्रलयाच्या तडाख्यातून चिपळूणची जनता सावरु लागली आहे.पण महापुराने शहरात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शेकडो घरातील भिजलेल्या वस्तुंचा खच रस्त्यावर पडलाय.मोठ्या प्रमाणात धान्य भिजून कुजले आहे.त्याची दुर्गंधीही सर्वत्र पसरली आहे.यामुळे रोगराईची भीती निर्माण झाली आहे.पण आता स्वच्छता मोहिमेलाही जोर आलाय.स्थानिकांच्या मदतीला विविध सामाजिक संस्थाही स्वयंस्फूर्तीने सहभागी झालेले आहेत.त्यात डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानही आघाडी असून,गेल्या दोन दिवसांपासून स्वच्छ,सुंदर चिपळूणसाठी हजारो श्रीसदस्य स्वयंस्फूर्तीने स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले आहेत.

चिपळूण शहर तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये आलेल्या महापुरामुळे प्रचंड प्रमाणात चिखल आणि कचर्‍याचचे साम्राज्य निमार्ण झालेले आहे.येथील चिखल तसेच परिसर स्वच्छ करण्यासाठी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत श्री सदस्यांनी पद्मश्री डा.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी देखील काही दिवसांपूर्वी चिपळूण बाजारपेठेतील सुमारे 190 टन कचरा उचलून चिपळूण बाजारपेठ स्वच्छ करुन मोलाचे योगदान दिलेले हाते . त्याप्रमाणे बुधवारी.4 ऑगस्ट 2021 रोजी देखील पुन्हा एकदा श्री सदस्यांनी मोठ्या प्रमाणावर स्वच्छता अभियान राबवून पेठेमाप,गोवळकोट रोड,मुरादपूर,शंकरवाडी परिसरामध्ये असणारा कचरा उचलून मोलाचे योगदान दिलेले आहे . तसेच चिपळूण परिसरातील पेठेमाप, गोवळकोट रोड, मुरादपूर,शंकरवाडी परिसरामध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर महापूरामुळे चिखल साचून रस्त्यावरुन या परिसरामध्ये राहणार्‍या नागरिकांना प्रवास करणे देखील अत्यंत कठिण झाले होत.तसेच रस्त्यालगतच्या गटारामध्ये चिखल साचून गटारे तुंबूून राहिलेली होती. त्यामुळे मोठया प्रमाणावर दुर्गधी निर्माण होऊन साथीचे रोग देखील सुरु होण्याची फार मोठी शक्यता होती.मात्र हीच बाब ओळखून श्री सदस्यांनी काल पुन्हा एकदा सेवेच्या व्रतातून रस्त्यावर उतरुन सदर परिसरामध्ये असणार्‍या गटारांची स्वच्छता करुन गटारामध्ये असणारा गाळ,कचरा स्वच्छ केला. तेदेखील स्वच्छ नागरिकांना मोकळे करुन देण्याची भूमिका पार पाडली.


चारशे स्वयंसेवक सहभागी
हे स्वच्छता अभियान राबवताना दापोली,पोलादपूर,महाबळेश्‍वर,रत्नागिरी, गुहागर तालुक्यातील 400 हून अधिक श्रीसदस्यांनी सहभाग घेतला होता .हे स्वच्छता अभियान राबवताना सर्व श्री सदस्यांनी स्वच्छ खर्चाने उपस्थित राहून स्वखर्चाने 1 जेसीबी,6 डंपर,8 ट्रॅक्टर सोबत आणलेले होते.तसेच सोबत स्व:ताचा डबा,पाण्याची बाटली देखील आणलेली होती. चिपळूण मध्ये मोठया प्रमाणात पाउस असताना देखील कुठेही न थांबता आपले स्वच्छतेचे कार्य सुरुच ठेवले होते.हे कार्य सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु राहीले . यामध्ये एकूण 190 टन कचरा व गाळ स्वच्छ केला

या पार पडलेल्या स्वच्छता अभियानाबाबत श्रीसदस्यांना विचारले असता श्रीसदस्यांनी सदरचे स्वच्छता अभियान आम्ही डॉ . श्री . नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत श्री सदस्यांनी पद्मश्री डॉ . श्री . आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने व रायगडभुषण श्री . सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार व श्री समर्थ बैठकीतून होणार्‍या उत्तम संस्कारातून हे स्वच्छता अभियान पार पाडले,असे आवर्जून नमूद केले.
गुरुवारीही चिपळूण बाजारपेठ व शहर परिसरातील आजूबाजूचे पेठेमाप, गोवळकोट रोड,मुरादपूर,शंकरवाडी परिसरामधील चिखल,कचरा तसेच महापुराने माखलेली व चिखलाने बंद झालेली गटारे स्वच्छ करण्याकरिता कोलाड, माणगाव,रोहा,पुणे, शहापूर, इंदापूर, नागोठणे, मुंबई या भागातून सुमारे 800 श्रीसदस्य स्वखर्चाने स्वतःचे घमेले,फावडे, कुदळ,डंपर,ट्रक,जेसीबी, टॅक्टर सोबत आणून स्वच्छता अभियानाकरिता उपस्थित राहून फार मोठे सहकार्य केले आहे . या उपक्रमाचे चिपळूण नगरपरिषद,शहरवासीय,प्रशासकीय यंत्रणा व्यापारी यांनी कौतुक करुन अत्यंत ऋणी असल्याचे आवर्जून नमूद केले.

Exit mobile version