| चिपळूण | प्रतिनिधी |
कुंभार्ली घाटामध्ये घाट नादुरुस्त असल्यामुळे अपघात होत आहेत, त्यामध्ये जीवितहानी होत आहे. पावसाळ्यामध्ये घाट ना दुरुस्त असल्यामुळे व धोकादायक असल्यामुळे अवजड वाहने जात असल्याने फोर व्हीलर टू व्हीलर वाहने जाणे कठीण झाले आहे. तरी कुंभार्ली घाट व्यतिरिक्त अवजड वाहने अन्य मार्गाने वाहतूक सुरू करावी, अशी मागणी चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी केली आहे.
शौकत मुकादम म्हणाले की, भोर घाटामध्ये ज्या पद्धतीने काम झाले आहे, त्या अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेऊन कुंभार्ली घाटाची दुरुस्ती व अन्य दुरुस्ती व रुंदी करण्याचे काम करण्यात यावे. कोकणामध्ये पावसाळ्यामध्ये दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. पूर्वी हा घाट सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूणकडे होता, आता तो घाट नॅशनल हायवे चिपळूण यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सध्या गुहागर विजापूर या तीन पदरी रस्त्याचं काम अनेक वर्ष बोंबलत पडला आहे. सरकारचे धोरण काही वेळेला चुकीचं होतं, अशी टीका शौकत मुकादम यांनी केली आहे.
तसेच, गुहागर-विजापूर हा तीन पदरी हायवे शासनाने मंजूर केला होता, मग इतर ठिकाणी तीन पदरी आणि घाटामध्ये एक पदरी हा धंदा कुठला? त्यामुळे अजून किती लोकांचे बळी शासनामार्फत घेतले जाणार आहेत, असा सवालही शौकत मुकादम यांनी उपस्थित केला आहे. आत्ता पावसाळ्यामध्ये घाटाची परिस्थिती बिकट आहे, त्यामुळे वीस टायर पंचवीस टायर मोठी वहाने जातात, ती वाहन पावसाळ्यामध्ये बंद करण्याची मागणी शौकत मुकादम यांनी पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिरामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.