नांदगाव हायस्कूलला पुराचा तडाखा; लाखो रुपयांचे नुकसान

| मुरुड | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय यशवंतनगर नांदगाव हायस्कूल ला पुराच्या पाण्याने वेढल्यामुळे शाळेचे कार्यालयासह प्रत्येक वर्गात चार फूट पाणी शिरल्यामुळे या शाळेतील असंख्य वस्तूंचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

सुरुवातीला 348 मिलीमीटर तद्नंतर दुसर्‍या दिवशी 204 मिलीमीटर एवढा पाऊस पडल्याने नदी शेजारी व समुद्राशेजारी असणार्‍या सर्व गावांना व शाळा याना मोठा धोका पोहचून वाढलेल्या पाण्याला जाण्यास इतर कोठेही जागा नसल्याने सर्व पाणी लोकांच्या घरात व शाळेत शिरल्याने सर्वांचे मोठे आर्थिक मोठे नुकसान झाले आहे.नांदगाव हायस्कूल मध्ये तर प्रत्येक वर्गात व कार्यालयात चार फूट पाणी शिरल्याने खुर्च्या , टेबले, पाठयपुस्तके,संगणक पाण्यात तरंगू लागली.या हायस्कूल मधील चार सी.पी.यु ,एक प्रिंटर,दोन प्रोजेक्टर,शाळेचा जनरेटर,कॅन्टीन मध्ये असणारा फ्रिज,शाळेतील पार्थनेसाठी वापरण्यात येणारा लॉउडस्पीकर,विद्यार्थ्यांचे हजेरी पत्रक,ग्रंथालयातील पुस्तके, इयत्ता पाचवी ते आठवी शाळेच्या शालेय विद्यार्थ्यांना मोफत दिली जाणारी पाठय पुस्तके,सॅनिटायझर मशीन,विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रीका,शाळेचे जनरल रजिस्टर,शिक्षकांची सेवा पुस्तके,कॅन्टीन मधील मिक्सर व ओहन आदी सह असंख्य वस्तू पाण्याखाली भिजल्याने या शाळेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.मागील वर्षी 3 जून रोजी निसर्ग चक्री वादळाच्या वेळी सुद्धा सदरील हायस्कूल चे सर्व सिमेंट पत्रे व कौले उडून गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले होते. परिस्थिती पहाण्यासाठी प्रत्यक्ष महसूल खात्याच्या तलाठी मयेकर मॅडम यांनी या शाळेची पहाणी करून पंचनामा केला आहे.यावेळी या शाळेचे चेअरमन फैरोज घलटे,मुख्याध्यापक चिंतामणी जोशी,संचालक अस्लम हलडे आदी सह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते,.

Exit mobile version